Wednesday 28 September 2016

» दुःख ...!!

१)
फोन मध्ये Block‬ करून परत ‎Unblock‬ करण
खूपच सोप असत पण मनातून एकदा ‎Delete‬ केलेला माणूस परत मनात
‪‎Add‬ करणे khup अवघड असते...!!!
-----////-------///-------////-----

२)
आयुष्याची बेरीज खूप वेळा केली पण मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच नाही
जेव्हा पडताळणी झाली. तेंव्हा समजले कि,
आठवण सोडून काहीच शिल्लक उरत नाही..!
-----////-------///-------////-----

३)
*न कळत्या वयात आम्ही सर्व मित्र होतो...*

*आज मात्र कुणी ब्राम्हण, कुणी मराठा, कुणी रोहीदास, कुणी बौध्द .....*
कुणी काय अन् कुणी काय.??

*मी मात्र माझ्यातलाच "माणुस" शोधतोय.....*
-----////-------///-------////-----

४)
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम,
करतो तिच्या शेजारी बसने आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे..
  -----////-------///-------////-----

५)
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही !
-----////-------///-------////-----

६)
एका फळ विक्रेत्याकडे थांबलो
होतो मी विचारले आज काय
भाव आहे द्राक्षंच्या घडांचा ?

तो बोलला :- ८० रूपये किलो..

जवळच सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती,

मी त्याला विचारले :
ह्यांचा काय भाव आहे ?

तो बोलला : ४० रूपये किलो,

मी त्याला विचारले :
इतके कमी का ?

तो बोलला :- साहेब, ही
खुप चांगली द्राक्ष आहेत..!!

पण आपल्या घडातुन तुटलेली
आहेत मी समजून गेलो आपल्या
जवळच्यांच्या पासून वेगळे
झाल्यावर आपली ' किंमत '
अर्ध्याहून कमी होऊन जाते..!
-----////-------///-------////-----

७)
शब्दसागरात माझ्या अचानक उमलून आले मोती

जुन्या आठवणीँच्या प्रवाहा बरोबर वाहून गेली नाती

जवळ जावून पाहिले तेव्हा सत्य उमगले

हृदयाच्या निरंजनातल्या मझ्या विजुन गेलत्या ज्योती

निराश अशात्या तलावामद्दे फक्त तरंगत होत्या वाती .
-----////-------///-------////-----

८)
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तुही एकायका मला

असतो कधी इथे मी असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेला शोधायला मला

का रात्र हि अमेची जागून काढली
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते न भेटले कधी
आले नको नको ते बिलगायला मला

हलकेच हाथ मी हि हातात घेतले
होतेच शब्द कोठे बोलायला मला .
 
-----////-------///-------////-----

९)
आयुष्यात वाईट तेव्हावाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट
तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो...!!
-----////-------///-------////-----

१०)
आठवण एक साठवण असते ...
ती आपल्या भूतकाळाची साक्ष असते ...
तिला कसलेही बंधन नसते ...
ती नकळत येते अन हास-या डोळ्यात अश्रू देऊन जाते .!
-----////-------///-------////-----

११)
होता असा एक काळ सारे नम्र
होते मजपुढे
झेलण्यास शब्द माझा होते उभे
माघेपुढे
आता कुठे तो काळ ,त्याची खून
हि नं राहिली
आसवे माझी स्वतःच्या काबूत
नाही राहिली.!
-----////-------///-------////-----

१२)
पदरात दु:ख माझ्या
देवाने इतक दिलय ।

जित तिथ मला
त्याने हानून पाडल ॥

यना कुणाचा हात हाती
सोबतीला माझ्याना
कुणाच्या शब्दांचा आधार ॥

मनास माझ्या ह्रुदयाला
माझ्या इतक्या खोल आहेत ॥

इजा ची मलमपट्टी करून ही
होणार नाहीत त्या वजा ॥

समुद्राच्या मधोमध
अडकलीय जीवनाची नाव ।

ना कीनारा सापडेना
ना कुठले गाव खोलवर ॥

अंधारात जिवन जाउन
थबकलय साधी प्रकाशाची ना
चाहुल अनं जिवन हातुन निसटलय..!
-----////-------///-------////-----

१३)
आज ती ही मला परखी झाली,
जी कधी माझ्यासाठी झुरत होती..

आज ती ही खोटी वागली,

जी आयुष्यभर साथ देण्याची,
माझ्या शपता खात होती..

तुझी खुप आठवण येते रे,
जी नेहमी असे म्हणत होती..

तुला पहावसं वाटतय रे,
जी हे आतुरतेने सांगत होती..

तुझ्या शिवाय करमत नाही रे,
जी असे बोलत होती..

नाही जाणले तिने मन माझे,
जी माझ्या ह्रदयात राहत होती..

नाहीच कळले तिला प्रेम माझे,
जी माझी न राहता दुस-याची
झाली होती..!
-----////-------///-------////-----

१४)
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो ।

सागराने ऐन वेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो ।

मागतो जो तो फुले ताजी
तवानी कोण निर्माल्यास येथे
भाव देतो ?

खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे ।

ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो
हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी ।

आज दुःखाला जरासा वाव देतो..!
-----////-------///-------////-----

१५)
वाट पाहणं त्रासदायक नसतं..
.

.

.

.

त्रासदायक असते ही
जाणीव की आपण ज्या
व्यक्तीची वाट पाहतोय..
.

.

.

.

.

ती व्यक्ती आपल्या
आयुष्यात परत येणार
नाहीये..!
-----////-------///-------////-----

१६)
आज ही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु
आले..

आज ही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड
लागले..

येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप
सावरले तरि ही पुन्हा
तेच झाले..

सर्व जुने पुन्हा नवे झाले..

कुणी नाही तु माझी
मनाला माझ्य खुप
समजावले तरि ही
पुन्हा तेच झाले मन
तुझ्या विना उदास झाले..

जगायचे आयुष्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरि हि पुन्हा तेच झाले

तुझ्याविना हे आयुष्यच
नकोसे झाले..!
-----////-------///-------////-----

१७)
दूर जाणाऱ्या तुझ्या
डोळ्यांत मी माझ्या
पासूनच दुरावत होतो..

तुझ्यातून विलग होऊन
पुन्हा तुझ्यातच हरवत होतो..

तुझ्या शिवाय जगण तर
सोडच मरण सुद्धा कठीण
आहे..

उरलेल्या प्रत्येक श्वासात
आता अखंड जळण आहे..!
-----////-------///-------////-----

१८)
प्रेम होत नाही ते व्हाव लागत,

प्रेम असतं नाही ते असाव लागतं,

प्रिये कोणावर कीती प्रेम आहे
हे दाखवाव लागत नाहि..

तर ते जाणुन घ्याव लागतं..

नको देऊस प्रेम तुझे आता
भीती वाटायला लागलेय..

कुठे तरी सावरतोय पुन्हा
रक्त बंबाळ होईल वाटतंय..

माझ्या प्रेमाला तू
खेळ समजू नको..

तुट्लोय मी आतून
अजून जखमा देऊ
नकोस..!
-----////-------///-------////-----

१९)
अजुन ही डोळ्यांत
आठवणीँचा कल्लोळ
होतो..

अन् त्यातील अश्रू
सैर-वैर होतो..

आठवणींना सावरता
अन्विसरता मन भरुन येते..

तितक्यातच डोळ्यांतील
धरण ओथंबुन येते..

रस्त्यावरुन चालताना
तुझ्या सावलीची आठवन
येते..!

कधी अंधार सरुन ऊन
पडावे याचीच चाहूल होते..

पावसाच्या सरीँचा तुझ्या
पैँजनांसारखा आवाज येतो..

त्यात हरपून जावे ईतका
सुंदर सुर तयार होतो..

तोच या आठवनिँचा कल्लोळ
प्रत्येक ऋतुत अन् क्षणात दिसतो

त्यात तुझ्या आठवनिंना
कवटाळून मी माञ एकटाच
रडतो..!
-----////-------///-------////-----

२०)
रडू तर येत होत,

डोळ्यात मात्र दिसत नव्हत,

चेहरा तर कोरडा होता,

पण

मन मात्र भिजत होत..

डोळ्याच रडणे
हे कामच असत,

कारण

डोळे पाहणारे बरेच असतात..

पण

मनाचे रडणे दिसत नाही..

कारण,

मन जाणणारे कमी असतात..!
-----////-------///-------////-----

No comments:

Post a Comment