Tuesday 27 September 2016

» आई बाबा !!

१)
आज मातृदिन....
॥आई॥

घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

"स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.."
"आ " म्हणजे ’आत्मा’.
" ई " म्हणजे " ईश्वर "(परमात्मा)...
आत्मा व परमात्मा यांचे एकरुप...
ती ’ आई ’...
मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
-----////-------///-------////-----

२)
आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई! 
-----////-------///-------////-----

३)
बाळाला जन्म दिल्यावर
वडिलांसह प्रत्येक जण विचारतो..

"मुलगा की मुलगी" ?

फक्त आईच विचारते,
"माझं बाळ कसं आहे" ?

तिला प्रश्न पडत नाही..
"मुलगा की मुलगी" ?

म्हणून तर ती आई असते..!
-----////-------///-------////-----

४)
जगातील प्रत्येक
घर हे शाळा आहे,

आणि माता- पिता हे शिक्षक..

तीन गोष्टी जीवनात सतत देत राहा:

१) मान

२) दान

३) ज्ञान
-----////-------///-------////-----

५)
देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला...
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...आणि विचारलं दुसरं
काही मागा.... तर तुम्ही काय मागणार..?? '
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा
आधिकार मागनार...
.
कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच
नाहीत..."
हे आहे आईचे प्रेम....
''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!
-----////-------///-------////-----

६)
एकदा मी स्वप्नात देवाला विचारले………

“तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन
जातोस???”

देव म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात

ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…..”

… … … मी म्हणाले “याचा अर्थ

मी तुला आवडत नाही???”

देव म्हणाला, “तस नाही ग! तु पण मला खुप
आवडतेस!”

मी म्हणाले, “मग मी या पृथ्वीवर अजुन
कसी आहे???”

देव म्हणाला, “तु पृथ्वीवर
माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतेस
म्हणुन आहे….
आपल्या आईवडिलांचा आदर करायला शिका त्यांच्यापुढे देवाच्या पण माना झुकतात आपण तर .........
-----////-------///-------////-----

७)
बाबा.....
चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे चीज करतो.
चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो ।
असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात
मिळवणी करतो तो।
माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो

घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज
उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो।
उच्च अधिकारी होतो तो,
गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I
कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील
पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।
-----////-------///-------////-----

८)
प्रेम म्हणजे...............?
मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणझे नेमके
काय?
मी त्याला सागितले की ...
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश
चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे
बोल म्हणजे प्रेम.
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-
मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि
कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम....
-----////-------///-------////-----

९)
आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ???
मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे घेऊन
जाईल.....
आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले तर....????
मुलगा : मी खूप पैसे जमा करेल आणि विदेशात घेऊन जाईल
ऑपरेशन
साठी...
मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर तू काय
करशील ?
आई हसत हसत म्हणते, " बेटा, मी तुला माझे डोळे देईल "
.....शेवटी "आई ती आईच " तीची जागा कोणीही घेऊ शकत
नाही....
आवडले तर नक्की शेअर करा....!
-----////-------///-------////-----

१०)
बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
'' आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल....''
हे ऐकून मुलगा रडायला लागला....आणि त्याने विचारलं,
'' तिथे माझी काळजी कोण घेणार??? ''
देव म्हणाला , '' मी एक परी पाठवली आहे...ती तुझी खूप छान काळजी घेईल..''
बाळाने पुन्हा विचारलं, '' मला बोलायला कोण
शिकवणार??? '' देव म्हणाल, '' तीच परी तुला बोलायला शिकवेल...''
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ''
मी तुझी प्रार्थना कशी करणार??''
देव म्हणाला, '' परी तुला शिकवेल..''
बाळाने विचारलं, '' मी त्या परी ला ओळखणार
कसं??''
देव म्हणाला , '' ओळखायला वेळ नाही लागणार....पृथ्वीवर लोक तिला 'आई' म्हणतात....'
-----////-------///-------////-----

११)
बाळाला जन्म दिल्यावर
वडिलांसह प्रत्येक जण
विचारतो..

"मुलगा की मुलगी" ?

फक्त आईच विचारते,

"माझं बाळ कसं आहे" ?

तिला प्रश्न पडत नाही,

"मुलगा की मुलगी" ?

म्हणून तर ती आई असते..
-----////-------///-------////-----

१२)
तो बाप असतो..
तो बाप असतो...!!

चांगल्या शाळे मध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो..

donation साठी
उधार आणतो, वेळ
पडली तर हाता पाया
पडतो..तो बाप असतो,

कॉलेज मध्ये सोबत जातो,

होस्टेल शोधतो,

स्वतः फाट्क बनियन
घालून तुम्हाला jeans
ची pant घेऊन देतो..!!

तो बाप असतो.,

स्वतः टपरा mobile वापरून,

तुमहाला stylish
mobile घेऊन देतो,

तुमच्या prepaid चे
पैसे स्वतःच भरतो,

तुमचा आवाज
ऐकण्यासाठी तरसतो,

तो बाप असतो..

love marriage करायला
कोणी निघाल तर खूप चिडतो,

"सगळ नीट पाहिलं का?"

म्हणून खूप ओरडतो,

"बाबा तुम्हाला
काही समजत का?

"अस ऐकल्यावर खूपरडतो,

तो बाप असतो..

जाताना पोरगी सासरी,
धाय मोकळून रडतो,
माझ्या चिऊला नीट
ठेवा असे हात जोडून सांगतो,

तो बाप असतो..

वडिलावर खूप कमी
कविता असतात म्हणून

"Happy Fathers day"
-----////-------///-------////-----

१३)
!! आदर्श आई तू !!

संस्कराची महान ज्योति तू
निर्भिड रूपी खरा इतिहास
जगी निर्मिला तू…

माणसाला माणूस म्हणुन
ओळखनारी तू, जति धर्माचा
भिंती पाडणारि तीक्ष्ण पहार
तू, स्वभिमानाची तू महान क्रांति
होती तुझ्याच आदर्शसाने शिबाचे
तलवार उजळली होती…

खरे शत्रु ओळखन्याची तुझी
नजर होती,सर्व धर्मियांसाठी
तू दयेचा सागर होती !! आई !!
-----////-------///-------////-----

१४)
सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…

॥मातृ दिनांच्छा शुभॆच्छा॥
-----////-------///-------////-----

१५)
!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आहॆ !
-----////-------///-------////-----

१६)
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य...

या जगात कोणती ही मुलगी ही,

तिच्या नव-यासाठी त्याची

"राणी"

नसेल ही कदाचित..

पण..?????

तिच्या वडिलांसाठी ती,

नेहमीचं एक सुंदर

"परी"

असतेचं...
-----////-------///-------////-----

१७)
'आई' साठी आई....
लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असत जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!
-----////-------///-------////-----

१८)
|| आई ||
.
.
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
.
.
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
.
.
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी
सारयांना आई च घर दावतं
.
.
आई च्या हाताला
असते चव लई भारी
आई चा हाताने
खाण्याची बातच हो न्यारी
.
.
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
.
.
आई चा राग म्हणजे
बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप
तेव्हा सापडणे आपली वाट
.
.
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...!
-----////-------///-------////-----

१९)
आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!

आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!

आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!

आई म्हणजे मंदिराचा कळस…

आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!

आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!

आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!

आई म्हणजे वेदने नंतरची
सर्वात पहिली आरोळी -:

आ ................ई...............!
-----////-------///-------////-----

२०)
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात !!
-----////-------///-------////-----

No comments:

Post a Comment